Last Updated: Monday, May 19, 2014, 20:59
www.24taas.com, झी मीडिया, पोर्ट ऑफ स्पेन वेस्ट इंडीजला लवकरच लाराची छबी असलेला नवा चेहरा क्रिकेटमध्ये बघायला मिळणार आहे. हा १४ वर्षीय क्रिस्टन कालिचरण असून तो मूळ भारतीय वंशाचा आहे.
कालिचरण `विष्णू बॉइज हिंदू कॉलेज` संघाकडून खेळत आहे. वेस्ट इंडीज संघाला कालिचरणच्या रुपात नवीन लारा मिळाला असल्याचे त्रिनीनाद अँड टोबॅगोचे क्रीडामंत्री अनिल रॉबर्ट्स यांनी म्हटलंय.
नुकतचं झालेल्या शालेय क्रिकेट लीगमध्ये कालिचरणने एका सामन्यात ३५ ओवर्समध्ये नाबाद ४०४ धावा काढल्या. या सामन्यात त्याने ४४ चौकार आणि ३१ सिक्सर्स मारत, फक्त ४२ रन्स धावून काढल्या आणि एका नव्या विक्रमाची नोंद केली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 19, 2014, 20:29