Last Updated: Wednesday, November 27, 2013, 18:15
www.24taas.com, झी मीडिया, लाहोर पाकिस्तान क्रिकेटर अब्दुल रझाक याच्या घरावर दरोडा पडलाय. यावेळी दरोडेखोरांनी अब्दुलला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरातच बांधून ठेवला आणि तिथून पळ काढला.
पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रझाक यानं या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल केलीय. मंगळवारी, रात्री अचानक आपल्या लाहोर येथील घरात घुसून आपल्या पासपोर्टसह ३८ औंस सोनं, आठ हजार डॉलर्स आणि अडीच हजार पौंड एवढी रक्कम घेऊन पोबारा केल्याचं त्यानं यावेळी म्हटलंय.
अचानक घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी बंदुक दाखवून अब्दुल आणि त्याच्या कुटुंबीयांना धारेवर धरलं. यावेळी या दरोडेखोरांनी आपल्या चेहऱ्यावर मुखवटे धारण केले होते. बंदुक दाखविल्यामुळे सर्वच कुटुंबीय धास्तावले होते. त्यानंतर चोरट्यांनी पासपोर्ट, सोनं आणि पैशांची मागणी केली. हा सगळा प्रकार रझाक कुटुंबीयांचा थरकाप उडवणारा होता... त्यातच दरोडेखोरांनी घरातील किंमती वस्तूंचा शोध घेताना सर्व कुटुंबीयांना बांधून टाकलं होतं, असंही रझाक यानं म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 27, 2013, 18:11