आजपासून रंगतोय `महिला वर्ल्डकप`चा थरार!, Women`s World Cup to kick off with India-WI clash

`महिला क्रिकेट वर्ल्डकप`चा आजपासून थरार!

`महिला क्रिकेट वर्ल्डकप`चा आजपासून थरार!
www.24taas.com, मुंबई

दहाव्या वुमेन्स वर्ल्डकपला आजपासून मुंबईत सुरूवात होतेय. वर्ल्डकपची ओपनिंग मॅच ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे ती, ‘ग्रुप ए’ मधील भारत विरूद्ध वेस्ट इंडिज अशी...

मिताली राज हिच्या नेतृत्वाखाली खेळणारी भारतीय टीम मायभूमीत होणाऱ्या वर्ल्डकपचं जेतेपद मिळवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहे. याआधी २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं होतं. ओपनिंग मॅचमध्ये वेस्ट इंडिजचं भारतीय महिलांसमोर आव्हान असणार आहे. २०१२ च्या सुरूवातीला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिलांना वन-डे सीरिज २-१नं गमवावी लागली होती. त्यामुळे भारतीय महिला पराभवाची परतफेड करत वर्ल्ड कपची विजयी सुरूवात करण्यास आतूर असणार आहे.

आजपासून सुरू होणारा महिला वर्ल्डकपचा थरार १७ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. विश्वचषकाच्चा पहिल्या आणि शेवटच्या समान्याचा मान मुंबईच्या ब्रेबॉर्नलाच मिळालाय. संघाची दोन गटांत विभागणी केली असून प्रत्येक गटामध्ये चार संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. भारताचा संघ ‘अ’ गटात असून त्यांना इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका या संघांचे आव्हान असेल.

First Published: Thursday, January 31, 2013, 11:23


comments powered by Disqus