युवराजला दणका, इन्कम टॅक्सचा ससेमिरा... yuvraj get notice from income tax department

युवराजला दणका, इन्कम टॅक्सचा ससेमिरा...

युवराजला दणका, इन्कम टॅक्सचा ससेमिरा...
www.24taas.com, झी मीडिया, चंडीगढ़

केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने युवराज सिंगला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये युवराजला सहारा एडवेंचर स्पोर्ट्स जाहिरातीपासून मिळालेल्या इन्कममधील ४६ लाख ६० हजार रूपयांचा कर द्यायला सांगितला आहे.

चंडीगढ विभागाच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागतील उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नोटीसमध्ये २०१२ ते २०१३ या वर्षाचा कर युवराजला भरायला सांगण्यात आलं आहे. युवीच्या मनिमाजरामध्ये असलेल्या घराबाहेर ही नोटीस लावण्यात आली आहे. युवराजला कलम ६५ (१०४ सी)च्या आधारे नोटीस बजावण्यात आली आहे.

विभागीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार,सहारा एडवेंचर स्पोर्ट्सने आपल्या प्रचारासाठी युवराजला ४ करोड १४ लाख रूपये दिले. या बदल्यात केंद्र सरकारचा सर्व्हिस टॅक्स देण्यासाठी युवीला नोटीस बजावली आहे. युवराजने आतापर्यंत सर्व्हिस टॅक्स विभागाला ३६ लाख रूपये दिले आहेत. पण अजून जितकी रक्कम देणं बाकी आहे, त्या रकमेची भरपाई करण्यासाठी युवीला सांगण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 17:31


comments powered by Disqus