Last Updated: Monday, November 5, 2012, 13:40
www.24taas.com, मुंबई इंग्लडविरूद्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघामध्ये १४ जणांचा समावेश आहे. आजारातून उठलेल्या युवीचे संघात पुनरागमन झाले आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीमची घोषणा आज करण्यात आली. युवराज सिंगबरोबरच कामगिरी चांगली नसलेल्या हरभजन सिंगलाही स्थान देण्यात आले आहे. युवी आणि भजीमुळे टीम इंडियात उत्साहाचे वातावरण आहे. या दोघांच्या कामगिरीकडे आता लक्ष असणार आहे.
टीम इंडियामध्ये कर्णधाराची धुरा महेंद्रसिंग धोनीवर असणार आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, अजिक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, युवराज सिंग, हरभजन सिंग, आर अश्वीन, प्रग्यान ओझा, जहीर खान, इशांत शर्मा, उमेश यादव, मुरली विजय यांचा संघात समावेश आहे.
First Published: Monday, November 5, 2012, 13:40