भारतानं काढला वेस्ट इंडिजचा वचपा! Yuvraj, Rahul guide India A to 93-run win over West Indies A

भारतानं काढला वेस्ट इंडिजचा वचपा!

भारतानं काढला वेस्ट इंडिजचा वचपा!
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू

एकमेव टी-२० मॅचमध्ये वेस्ट इंडिज `अ`वर ९३ रन्सनी विजय मिळवत टीम इंडियानं आपल्या पराभवाचा वचपा काढलाय. कप्तान युवराज सिंगचं वादळी हाफ सेंच्युरी आणि राहुल शर्माची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर भारत `अ` संघानं वेस्ट इंडीज `अ`विरुद्धच्या एकमेव टी-२0 लढतीत ९३ धावांनी शानदार विजय मिळविला.

या विजयामुळं भारतानं वन-डे मालिकेतील पराभवाची परतफेड केली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं २० ओव्हरमध्ये २१४ रन्सचा विशाल डोंगर उभारला. त्यानंतर राहुल शर्माच्या सुरेख बॉलिंगसमोर विंडीजचा संपूर्ण संघ १६.२ ओव्हरमध्ये १२१ रन्स करुन तंबूत परतला.

युवराजनं आणखी उत्कृष्ट खेळी करून भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. त्यानं ३५ बॉल्सचा सामना करताना ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीनं ५२ रन्सची खेळी केली. सलामीवीर रॉबिन उथप्पानं केवळ २१ चेंडूंचा सामना करताना १ चौकार आणि ३ षटकारांसह ३५ धावा कुटल्या. युवा फलंदाज उन्मुक्त चंद यानं २९ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावांची उपयोगी खेळी केली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 22, 2013, 16:10


comments powered by Disqus