Last Updated: Wednesday, May 14, 2014, 21:46
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार केव्हिन पीटरसन याने आयपीएलमध्ये फॉर्म पुन्हा गवसलेल्या युवराज सिंह याच्यावर स्तुती सूमनं उधळली आहेत.
युवराज हा क्रिकेटचा सुपरस्टार असल्याचे पीटरसन याने म्हटले आहे. याआधी पीटरसन आणि युवराज यांच्यामधील वाद गाजला होता; तरीही पीटरसनने मुक्तकंठाने युवराजची प्रशंसा केली आहे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन संघांमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात युवराजने नऊ टोलजंग षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने अवघ्या 29 चेंडुंत 68 धावा केल्या होत्या.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स संघाने 16 धावांनी विजय मिळविला. या पार्श्वभूमीवर पीटरसनने याने युवराजची स्तुती केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 14, 2014, 21:46