Last Updated: Thursday, March 13, 2014, 16:32
www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलकाताभारताचा क्रिकेटपटू युवराज सिंहला बुधवारी डोपिंग चाचणीचा सामना करावा लागलाय. कोलकातातील ईडन गार्डन मैदानावर विजय हजारे चषक स्पर्धेनंतर युवराजसह आणखी दोन क्रिकेटपटूंची डोपिंग चाचणी करण्यात आली.
रेल्वे आणि पंजाब यांच्यातील मॅचमध्ये पंजाबचा १३७ रन्सनी पराभव झाला. या सामन्यात युवराजनं फक्त १५ रन केले. या सामन्यानंतर युवराज नियमित चाचणीला सामोरा गेला. युवराजसह रेल्वेचा कर्णधार महेश रावत आणि वेगवान गोलंदाज अनुरीत सिंह यांचीही चाचणी करण्यात आली.
तर दुसरीकडे युवराजनं खराब फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाची स्तुती केलीय. युवराज म्हणतो, आमच्याकडे बॅटिंग लाईनअपचं पावरहाऊस आहे. आमच्या टीमला थांबवणं कोणाचकरीता सोपं नसेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 13, 2014, 16:32