Last Updated: Monday, November 25, 2013, 15:09
www.24taas.com, झी मीडिया, बडोदाआगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणा-या वन-डे आणि टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. झहीर खानचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर गौतम गंभीरला पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे.
सचिन राणा हा एकमेव नवा चेहरा टीममध्ये आहे. भारता दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन वन-डे आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे. तर अंबाती रायडूला टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. 5 डिसेंबरपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-याला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, गौतम गंभीरला टीममध्ये स्थान मिळणार याची मोठी चर्चा होती.मात्र, सिलेक्शन कमिटीचा विश्वास मिळवण्यात अपयशी ठरला. त्याला पुन्हा एकदा टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
भारतीय संघशिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग ढोणी, रविचंद्र अश्विनच, भुवनेश्वर कुमार, महंमद शमी, झहीर खान, अंबाती रायुडू, उमेश यादव, वृद्धिमान साहा, ईशांत शर्मा, प्रग्यान ओझा, रवींद्र जडेजा
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 15:09