Last Updated: Friday, April 25, 2014, 15:27
www.24taas.com, झी मीडिया, शारजाआघाडीचा खेळाडू गौतम गंभीर हा आयपीएल सुरु झाल्यापासून आतापर्यंत सातवेळा शून्यावर आऊट झालाय. त्यांने मुंबई इंडियन्स, दिल्ली डेयरडेविल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या टीम विरोधात खेळाताना खातेही उघडू शकलेला नाही.
गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. त्याच्या नावावर मात्र, ही नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम गंभीरच्या नावावर जमा झाला आहे.
रॉयल चॅलेन्जर्स बंगोलरविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याआधी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धही त्याला खातं उघडता आलं नव्हतं. एखादा खेळाडू सलग तीन सामन्यात खातंही न उघडण्याची आयपीएलमधली ही पहिलीच वेळ आहे.
गौतम गंभीर आता जॅक कॅलिस आणि अमित मिश्रा, रोहित शर्मा, मनिष पांडे आणि हरभजन सिंह यांच्या पंक्तीत जाऊन बसला असून त्यांने यासर्वांना मागे टाकले आहे. गंभीरने आयपीएलमध्ये 91 सामन्यात आतापर्यंत 2471 रन्स केल्या आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 25, 2014, 15:25