Last Updated: Wednesday, May 15, 2013, 15:37
तुमच्याकडे बुद्धी-विद्वत्ता असल्यामुळे तुमचे बौध्दिक चर्चेमध्ये, बौध्दिक कामामध्ये मन रमते. त्यामुळे इतरांना सतत उपदेश करण्याची तुम्हाला सवय लागते. हां हे सत्य आहे की तुमच्या उपदेशातूनच तुमच्या बुध्दीमत्तेची जाणीव होते, पण त्याचबरोबर तुमच्यातील समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची प्रवृत्तीही दिसून येते. विद्या विनयन शोभते.
तुमचा आणखी एक स्वभाव म्हणजे तुमचा आरामदायी जीवनाकडे कल असतो. त्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही कष्टापासून जरा दूरच राहता. पण महत्त्वाचे म्हणजे तुमची आर्थिक ओढाताण होऊ लागली की `ठेवीले अनंते तैसेची रहावे`. असे न म्हणता तुम्ही उमेदीने जिद्दीने नोकरी व्यवसायामध्ये पुरेपूर बुद्धी वापरुन भरपूर कमाई करता. उन्नती साधता कारण मुळातच सुखासीन जीवनाची आवड!
तुमच्याकडे उदासीनता दिसतच नाही व तुम्हाला सहसा राग ही येत नाही. पण तुमच्या तत्वांचा कुणी अनादर केला, तुमच्या बुध्दीमत्तेची कुणी कुचेष्टा केली किंवा तुमच्या मनाविरुध्द एखादी घटना झाली तर तुम्हाला खुप दुःख होते. संतापही होतो पण राग येत नाही.
तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सौदर्यांपेक्षा त्यांच्यातील बुध्दीमत्ता, विद्वत्ता यावर अधिक प्रेम करता.
पंडीत मानसी, ज्योतिष विशारद+91 74987 77221
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 20:23