कसा असतो मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव, How is the nature of the persons of Gemini

कसा असतो मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

कसा असतो मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव
समयसूचकता, तर्कपध्दती, हास्यविनोद, लिखाण, हे चांगले गुण आणि अस्थिरता, गप्पागोष्टी, वेळ घालविणे, जाहिरातबाजी, चिडखोरपणा, पोरकटपणा हे तुमच्यामधील दूर्गूण आहेत.

तुम्हाला नवनवीन गोष्टींची आवड आहे. परंतु त्यातल्या नाविन्याची आवड ओढ संपल्यानंतर तुम्ही ते फेकून देतात.
समोरच्याला आपल्या बोलण्याने तुम्ही भांबावून सोडतात, तुमच्याकडे एवढा विनोदीपणा आहे की, तुम्ही समोरच्याला राग येईपर्यंत त्याची खिल्ली उडवितात.

एखाद्या गोष्टीची जाहिरातबाजी तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे तुम्ही मार्केटींग लाइनला परफेक्ट बसू शकतात. तुम्ही अतिशय कुशाग्र बुध्दीचे आहात. तुमची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे. स्मरणशक्ती, हजरजबाबीपणा असल्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रसंगामधून तुम्ही तुमच्या बुध्दी-चातुर्याने त्यातून सहज बाहेर पडू शकतात.

फक्त तुम्ही चटकन निर्णय घेऊ शकत नाहीत, किंवा तुमचे निर्णय तुम्ही एकदमच महत्वाच्या वेळी बदलतात. निर्णयाशी ठाम राहत नाही. यामुळे बऱ्याचवेळा तुमच्या जवळच्या लोकांना तुमचा त्रास सहन करावा लागतो.

पंडीत मानसी, ज्योतिष विशारद
+91 74987 77221

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, May 15, 2013, 16:33


comments powered by Disqus