कसा असतो मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव, How is the nature of the persons of Pisces

कसा असतो मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

कसा असतो मीन  राशीच्या व्यक्तींचा स्वभाव
तुम्ही स्वभावाने मनमिळावु, भावनाप्रधान, इतरांबद्दल सहानभुती बाळगणारे रुढी-परंपरा, अपार श्रध्दा ठेवणारे आहात. चंचलता द्विधा मनःस्थिती तुमच्यामध्ये दिसून येते. विसराळुपणा आणी भोळसटवृत्ती अंगी असल्यामुळे तुम्ही गोंधळलेले दिसतात. विचारातील निर्णयातील ठामपणा तुमच्यापासून काहीसा दूरच असतो.

तसे पाहीले तर दुसऱ्यांचा आदर करणारे तुम्ही दुसऱ्यांच्या विचारांनी इच्छेने मुळीच वागत नाही. स्वतःच्या मनबुध्दी स्वातंत्र्याने जगणारे असतात. मनाविरुध्द काही करावे लागले तर दुःखी होता. समाजामध्ये वावरताना आपले विचार स्पष्टपणे मांडण्याचे धैर्यही तुमच्याकडे अस्ते, पण निर्णय क्षमता कमी असते कारण तुमच्या मनामध्ये सदैव एक अनामिक भीती वास करत असते.

सतत मानसिक दडपणाखाली राहिल्यामुळे तुमचे निर्णय वारंवार बदलत राहतात. त्यामुळे महत्वाकांक्षेशिवाय तुम्हाला स्वतःला घडवता येत नाही. स्वतःचे एक वैशिष्ठय पूर्ण अस्तित्व निर्माण करता येत नाही. एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करणे निर्णय क्षमता ठेवणे आळशीपणा सोडून देणे या सद्गुणांचा स्वीकार केला तरच तुम्ही यशचे मानकरी ठराल.

तुम्हाला भविष्याची चिंतात्मक जाणीव असते त्यामुळे गरजेपुरता किंबहुना त्याहीपेक्षा अधिकच कमाईप्राप्त करण्याचा कल असतो. तस पाहीले तर बचत करणेचा बचावात्मक पवित्रा असतो. तुमच्या सानिध्यातील लोकांना तुम्ही कंजुस वाटता. पण स्वतःसाठी व इतरांसाठीही प्रसंगानुरुप खर्च करता.

पंडीत मानसी, ज्योतिष विशारद
+91 74987 77221


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 14, 2013, 20:02


comments powered by Disqus