कसा असतो धनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव, How is the nature of the persons of Sagittarius

कसा असतो धनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

कसा असतो धनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव
तुम्ही स्वभावाने गोड विवेकी महत्वाकांशी कार्यतत्पर उदार मनाचे आहात. तुम्ही मनाने मोकळे असले तरी विचार पक्के असतात. जीवनाचे तत्वज्ञानही तुमच्याकडे असते. सामाजिक कार्याची आवड असते. त्यामुळे गोरगरीबांना सढळ हाताने मदत करतात.

बुध्दीवादी असल्यामुळे राजकारणामध्ये ही अधिक प्रगती करु शकतात. दुसऱ्याचे वर्चस्व मान्य न करणे, कुशल नेतृत्व करणे या स्वभावामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती आणि सत्ता प्राप्त करु शकतात. राशी स्वभावाप्रमाणे तुम्ही थोडे कंजुश आहात. पण यश प्राप्तीसाठी किंवा काही साध्य होत असेल तर तुम्ही अमाप पैसा ही खर्च करतात. मग मात्र पैसा खर्च करताना कोणताही मागचा पुढचा विचार करत नाही.

देव धर्मरिती रिवाज यावरती तुमची अमाप निष्ठा असते. तुम्ही दिलदार दयाळू, हळवे, उदारमनाचे असूनही एखाद्या कार्यामध्ये मानपान करताना चुकून कमी राहिली तर लगेच रुसता रागवतात.

तुमचा सर्वांना माहित असलेला राशी स्वभाव म्हणजे मुडी स्वभाव. तसे पाहीले तर तुम्ही स्वभावाने हसतमुख मनमिळावू असल्यामुळे लहानांबरोबर लहान आणि मोठयांच्या बरोबर मोठे होऊन वागतात. त्यामुळे तुमच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तिशी तुमची पटकन जुळते जमते आणि टिकतेही.

नेहमी सत्य मार्गाने चालणे न्यायप्रियता या सद्गुणामुळे तुमचे कोणाबरोबरही सहसा शत्रुत्व होत नाही. समजा चुकून वादाचा प्रसंग उद्भवलाच तर त्यात वेळ न काढता तुम्ही चाणाक्षपणे तुमचा मार्गच बदलतात. सर सलामत तो पगडी पचास! वाद घालून एक शत्रू निर्माण करण्यापेक्षा दहा नविन मित्र जोडावेत या तत्वाने तुम्ही जीवनामध्ये पुढे जातात.


पंडीत मानसी, ज्योतिष विशारद
+91 74987 77221


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 14, 2013, 21:31


comments powered by Disqus