Last Updated: Sunday, October 7, 2012, 17:44
www.24taas.com, नवी दिल्ली अरविंद केजरीवाल यांनी सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर गंभीर आरोप केलेत. वढेरांच्या मालमत्तेची कसून चौकशी करण्याची मागणी यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केलीय. डीएलएफ कंपनी आणि रॉबर्ट बढेरा यांच्यातील आर्थिक व्यवहारांबद्दलही चौकशीची मागणी केजरीवाल यांनी केलीय.
आपल्या कुटुंबियांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र असून स्वस्तात लोकप्रियता मिळवण्यासाठी माझ्यावर असे आरोप केले जात आहेत’ असं रॉबर्ट वढेरा यांनी स्पष्टीकरण दिलंय. कुणाची बाजू तुम्हाला विश्वास ठेवण्यालायक वाटतेय? अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांची योग्य चौकशी होणार का? सोनिया गांधी यांचा जावई असल्यानं वढेरा यांना काँग्रेस पाठिशी घालतंय का? काय वाटतंय तुम्हाला...
तुमच्या प्रतिक्रिया आम्हांला 24taas.com वर बातमी खालील प्रतिक्रियांचा बॉक्स मध्ये नोंदवा..
First Published: Sunday, October 7, 2012, 17:44