Last Updated: Wednesday, October 31, 2012, 18:39
www.24taas.com, नवी दिल्लीरिलायन्स उद्योगाचं भलं करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही राजकीय पक्ष हातात हात घालून उद्योगपती मुकेश अंबानी यांना मदत करीत आहेत. काँग्रेस हे मुकेश अंबानींचे दुकान झाले आहे. मुकेश अंबानींच्या इशाऱ्यावर देशातील सरकार चालत आहे. सरकारने रिलयान्सला १ लाख कोटींचा फायदा करून दिला आहे. गॅस दरवाढविण्यासाठी गॅस उत्पादन निम्म्यावर आणलं गेलं आहे आदी गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
तुम्हांला काय वाटते. रिलायन्सला फायदा करण्यासाठी देशातील राजकारणी साटंलोटं करताहेत का? अंबानींवर केलेल्या गंभीर आरोप खरे असतील तर आपण खरं महागाचा गॅस रिलायन्सकडून खरेदी करावा का ? सामान्य माणसाला घरगुती सिलेंडर सवलतीच्या दरात दिल्यास केंद्राला ३५ हजार कोटींचे नुकसान होते. पण आता आरोपांनुसार सरकारने गॅस खरेदी करताना १ लाख कोटींच्या आसपास रिलायन्सच्या घशात घातले आहेत. या पैशाचं काय?
आपली मते बातमीच्या खाली प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये नोंदवा तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
First Published: Wednesday, October 31, 2012, 18:39