Last Updated: Thursday, November 8, 2012, 12:40
www.24taas.com,ठाणेदिवाळीच्या तोंडावर ठाण्यात एफडीएने पाच ठिकाणी छापे टाकून बारा लाखांचा मावा जप्त करण्यात आला आहे. हा मावा भेसळयुक्त असल्याचे पुढे आले आहे.
कल्याण, भाईंदर, ठाणे, मिरारोड या ठिकाणी हे छापे घालण्यात आले. माव्यात पिवळा रंग, वनस्पती आणि साखर टाकण्यात आली होती. तसंच तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आला नव्हता. दिवाळ्याच्या तोंडावर भेसळ होत असल्याचे पुढे आले आहे. या भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अस्वच्छ ट्रकमध्ये हा मावा ठेवण्यात आला होता. या माव्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. भेसळयुक्त मावा आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे परवानाधारक विक्रेत्यांकडूनच मावा खरेदी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
First Published: Thursday, November 8, 2012, 12:36