महिला बचत गटांचा `दिवाळी फराळ` Diwali Faral by Mahila Bachat Gat

महिला बचत गटांचा `दिवाळी फराळ`

महिला बचत गटांचा `दिवाळी फराळ`
www.24taas.com, पुणे

ज्या सणाची अनेक जण आतुरतेनं वाट पहात असतात तो सण म्हणजे दिवाळी.... अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेली दिवाळी आता कधी येतेय याचीच सर्वजण वाट पहात आहेत आणि दिवाळी म्हटलं की फराळ आलाच. सर्वच ठिकाणी हा फराळ बनवण्याची लगबग सुरु आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी बचत गटही पुढे सरसावलेत....

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं फराळाच्या पदार्थांचा सुगंध सध्या सगळीकडे दरवळतो आहे...दिवाळीत खरंतर बहुतेक घरी हे पदार्थ हमखास बनवले जातात...मात्र आजच्या धावपळीच्या युगात काहींना हे शक्य होत नाही. अशावेळी पावलं वळतात ती रेडिमेड पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानांकडे. महिला बचत गटांनी आता या कामी पुढाकार घेतलाय.

दर्जेदार आणि खमंग पदार्थ ते ही स्वस्तात त्यामुळ ग्राहकही हे पदार्थ घ्यायला पसंती देत आहेत. आर्थिक फायदा होत असल्यामुळे बचत गटातील महिलाही समाधानी आहेत. दिवाळी ही खऱ्या अर्थाने प्रकाश देणारा सण आणि त्यातच या पदार्थांचा गोडवा... जेवढा जिभेवर रेंगाळणारा तेवढाच एकमेकांमधला गोडवा वाढवणारा.

First Published: Sunday, November 4, 2012, 17:32


comments powered by Disqus