Last Updated: Monday, November 12, 2012, 19:46
www.24taas.com, पुणेइंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात स्वतः तयार केलेल्या शुभेच्छांचं महत्त्व कमी झालेलं दिसतं, पण चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन सेवा प्रकल्पातले अपंग आणि कुष्टरोगी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रिटींग्स बनवतात. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची उमेद वाढवण्यासाठी आणि प्रकल्पाला आर्थिक मदत होण्याच्या उद्देशानं यावर्षी दिवाळीत आनंदवनच्या ग्रिटींग्सनी.
आनंदवन...कुष्ठरोगी आणि अपंग व्यक्तींना सन्मानाने जगायला शिकविणारा प्रकल्प.... गेली अनेक वर्षं प्रकल्पातला हस्तकला विभाग दिवाळीच्या निमित्ताने हॅण्डमेड ग्रिटींग्स बनवण्याचं आणि ते विकण्याचं काम करतो..उद्देश इतकाच की या कुष्टरोगी आणि अपंगांनी स्वावलंबी व्हावं आणि यातुन येणाऱ्या पैशांचा प्रकल्पाला हातभार लागावा. या सगळ्यांनी तयार केलेली टाकाऊ वस्तूंपासूनची ग्रिटींग्स आनंदवन या ब्रँडनेमसह परदेशातही जातात.
मात्र इंटरनेट आणि हायटेक मोबोईल ग्रिटींगच्या जमान्यात या हॅण्डमेड ग्रिटींग्सना त्याची झळ बसते. त्यामुळे अपंग हातांना हुकमी रोजगार आणि वार्षिक आर्थिक मिळकत असा दुहेरी हेतू साध्य होणारा हा कलाप्रकार निदान आनंदवनच्या बाबतीत तरी संकटात सापडलाय.
बाबा आमटे यांनी लिहिलेल्या " शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाईन...दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही "या ओळी या आनंदवनवासियांना जगण्यासाठी बळ देतच आहेत पण समाजिक बांधिलकीची जाणिव ठेवत संगळ्यांनी या ग्रिटींग्समागचा आशय समजून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतेय..
First Published: Monday, November 12, 2012, 19:46