Last Updated: Sunday, November 11, 2012, 11:26
www.24taas.com,मुंबईआज धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. आजच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसंच धनाचीही पूजी केली जाते.
यासाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत अनेक मुहूर्त आहेत. आजच्या दिवशी वैद्यकीय व्यावसायिक धन्वंतरीची पूजा करतात. आजच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसतोय.
आजच्या दिवसाला यमदीपदान असंही म्हणतात. आजच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचं टोक दक्षिण दिशेस करतात. त्यामुळे अपमृत्यू टळतो अशी भावना आहे.
धनत्रयोदशीबद्दल आणखीही एक दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे, इंद्रदेवानं महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणासाठी असुरांबरोबर जे समुद्रमंथन केलं त्यातून देवलक्ष्मी प्रगट झाली. तसच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही पुजा केली जाते.
First Published: Sunday, November 11, 2012, 11:26