Last Updated: Friday, February 28, 2014, 11:28
www.24taas.com, झी मीडिया, दुबई दुबईतील एका कंपनीने सहा भारतीय विद्यार्थ्यांना ४४.४४ लाख रूपयांचे वर्षाला पॅकेज देऊ केले आहे. या वेतनात कर समाविष्ट करून त्यांचे वेतन ५० लाख रूपयांपेक्षा अधिक असणार आहे.
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आईआईएम) मधून सहा भारतीय विद्यार्थी पदवीधर झालेत. या विद्यार्थ्यांना दुबईमध्ये एका कंपनीने वार्षिक वेतन ४४.४४ लाख रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे. अहमदाबाद आणि कोलकाता संस्थेतील हे विद्यार्थी आहेत.
अबुधाबीतील `दुनिया फायनास` ही कंपनी आहे. या कंपनीने सहा भारतीय विद्यार्थीची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विद्यार्थीचे ४४ लाख रुपये वार्षिक वेतन करमुक्त आहे. त्यामुळे, ६६ लाख कर धरुन वेतन होणार आहे. तसेच चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना बोनससुद्धा मिळणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 28, 2014, 11:28