शिक्षणाचे किमयागार A man with High Educations

शिक्षणाचे किमयागार

शिक्षणाचे किमयागार
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीच्या डॉ. पी. जे. सुधाकर यांनी जिद्दीच्या जोरावर शिक्षण क्षेत्रातलं हिमालयही ठेंगणं केलंय. अवघ्या 67 वर्षांच्या डॉ. पी. जे. सुधाकर यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर 105 पदव्या आणि 12 विषयांमधील पीएचडी मिळवली आहे.

डॉ. सुधाकर यांचा जन्म आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्ट्णममध्ये अत्यंत गरीब कुटुंबात झाला. मात्र हलाखीच्या परिस्थितीतही केवळ मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एवढं उत्तुंग यश मिळवलंय. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास सर्वच शाखांमध्ये पदव्या मिळवल्यात.

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड जिद्द हे दोन गुण अंगी असतील तर माणसाला कुठलीही गोष्ट अशक्य नसल्याचंच डॉ. सुधाकर यांच्या उदाहरणावरून दिसून येतंय.

First Published: Monday, January 21, 2013, 22:19


comments powered by Disqus