शिक्षणाचा बाजार रोखणार, होणार कॉलेजेसवर कारवाई, Action : Coaching classes in College

शिक्षणाचा बाजार रोखणार, होणार कॉलेजेसवर कारवाई

शिक्षणाचा बाजार रोखणार, होणार कॉलेजेसवर कारवाई
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये क्लासेसनी दुकानं थाटलीयत, याचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आलीय. शिक्षण विभागानं यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय. जी कॉलेजेस अशा पद्धतीनं कॉलेज कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसना परवानगी देतात किंवा कोचिंग क्लाससाठी कॉ़लेजच्या वर्गखोल्या उपलब्ध करुन देतात, अशा ज्युनिअर कॉलेजेसवर कारवाई करण्यात येणार आहे.

कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचा बाजार कधीचाच सुरू झालाय. शिक्षणासारख्या उदात्त आणि पवित्र क्षेत्रात क्लासेसच्या मार्केटिंग मॅनेजर्सनी कधीचेच हातपाय पसरलेत. पण आता खुद्द कॉलेजांनीच आपापल्या आवारात कोचिंग क्लासेसची दुकाने थाटली आहेत. शिक्षणाच्या नावाखाली कॉलेज कॅम्पसमध्येच उघडपणे धंदा सुरू झाला असून, करोडो रूपयांची मलई यानिमित्ताने कॉलेजवाल्यांनाही मिळतेय.. याचा पर्दाफाश झी मीडियाने केल्यानंतर शिक्षण खातं खडबडून जागं झालंय... कोचिंग क्लासची दुकाने थाटणा-या कॉलेजवर कारवाईचा इशारा शिक्षण विभागानं दिला आहे.

याबाबत झी मीडियाने आवाज उठवला होता. त्यानंतर शिक्षण विभागाला जागा आली. याआधी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचा बाजार कधीचाच सुरू झाला, याबाबत वृत्त प्रसारीत झी २४ तासवर प्रसारीत करण्यात आले होते.. शिक्षणासारख्या उदात्त आणि पवित्र क्षेत्रात क्लासेसच्या मार्केटिंग मॅनेजर्सनी कधीचेच हातपाय पसरले आहेत. पण आता खुद्द कॉलेजांनीच आपापल्या आवारात कोचिंग क्लासेसची दुकाने थाटली आहेत. शिक्षणाच्या नावाखाली कॉलेजच्या कॅम्पसमध्येच उघडपणे धंदा सुरू झाला असून, करोडो रूपयांची मलई यानिमित्ताने कॉलेजवाल्यांनाही मिळत आहे.

कोचिंग क्लासेसचा उदय झाल्यापासून विद्यार्थी नव्हे तर परीक्षार्थी घडवले जात असल्याची ओरड शिक्षणतज्ज्ञांनी सुरू केलीय. त्यावर उपाय शोधण्याऐवजी आता खुद्द कॉलेजांनीच आपल्या कॅम्पसचे दरवाजे कोचिंग क्लासेससाठी सताड उघडे केलेत. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी कॉलेज आणि कोचिंग क्लासेस यांच्यात चक्क टाय अप होऊ लागलीत. करोडो रूपयांचा नफा कमवणा-या या क्लासेसनी आता मुंबईतल्या प्रतिष्ठित कॉलेजांवरही मोहिनी घातलीय.

मिळणा-या फीपैकी काही हिस्सा सरळसरळ या कॉलेजच्या मॅनेजमेंटला दिला जातो, असा आक्षेप घेतला जातोय. आता कॉलेज मॅनेजमेंटचीच अशी प्रायोरिटी बदलल्याने विद्यार्थी देखील क्लासेसनाच महत्त्व देऊ लागलेत. कॉलेजचे लेक्चर बंक करून ते केवळ क्लासेसमध्येच हजेरी लावत अल्ययाचे चित्र पाहायला मिळाले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 09:19


comments powered by Disqus