...तर राजन वेळूकर चालते व्हा - आदित्य ठाकरे , Aditya Thackeray on Rajan welukar

...तर राजन वेळूकर चालते व्हा - आदित्य ठाकरे

...तर राजन वेळूकर चालते व्हा - आदित्य ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यावरून विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत असताना आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. जर तुम्हाला मुंबई विद्यापीठाचा कारभार व्यवस्थित चालवता येत नसेल तर चालते व्हा, असा थेट हल्ला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर हे राजकीय नेत्यांचे टार्गेट झाले आहे. त्यांचे नाव न घेता जोरदार आदित्य यांनी टीका केली. प्राध्यापक हातेकर यांच्यावर कारवाई केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन करत थेट रस्तावर षड्डू ठोकला. वेळूकर हे शिवसेने टार्गेट झाले आहेत. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी आज आपले मौन सोडले. विद्यापीठ चालवता येत नसेल तर चालते व्हा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

डॉ. हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी विविध विद्यापीठांमधील शिक्षक संघटनांनी कुलगुरू राजन वेळुकर आणि राज्यपाल के. शंकरनारायणन यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, त्यांना काढून टाकलेले नाही. त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल, अशी प्रतिक्रिया वेळूकर यांनी व्यक्त केली होती. मात्र, डॉ. नीरज हातेकर यांना अद्याप आपले म्हणणे मांडण्याची मुभा दिलेली नाही.

दरम्यान, मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक गैरप्रकारांवर हातेकर यांनी हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. याविरोधात विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त आंदोलनही केले. मात्र, प्रा. हातेकर यांना विद्यापीठाचे दरवाजे बंद झाल्याने मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून, त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेरील डेरेदार वृक्षाखाली मंगळवारी दुपारी क्लास घेतले. यावेळी गुणाकार-भागाकाराऐवजी प्रिझनर्स डिलेमा, डॉमिनन्ट स्ट्रॅटेजी, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रिअम या `मायक्रो इकॉनॉमिक्स`मधल्या `गेम थिअरी`च्या किचकट संकल्पना उलगडल्या जात होत्या.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, January 16, 2014, 15:35


comments powered by Disqus