Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदहावीच्या परीक्षेत बीजगणिताचा फुटलेला पेपर पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांनीच मुलाला दिला होता, असा खुलासा केंद्र संचालकांनी केलाय. मात्र, हा पेपर 500 रूपयांना विकत घेतल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे दहावी परीक्षेला गालबोट लागले आहे.
कांदिवलीच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक शाळेत मंगळवारी हा पेपरफुटीचा प्रकार उजेडात आला होता. या केंद्राच्या संचालकांनी पोलिसांना तसेच एसएससी बोर्डाला दिलेल्या निवेदनामध्ये हा खळबळजनक खुलासा केलाय.
विशेष म्हणजे पर्यवेक्षकाने पोलीस अधिका-याच्या मुलाकडून जेव्हा कॉपी पकडली, तेव्हा ते छापील पेपर हे पोलीस कार्यालयातले असल्याचे आढळले आहे. परंतु आधी हा पेपर वडिलांनी दिल्याचा जबाब देणा-या विद्यार्थ्याने नंतर जबाब का फिरवला, नेमकी पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतरच जबाब का फिरवण्यात आला, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
एवढेच नव्हे तर मुलासाठी पेपर फोडणा-या पोलीस अधिका-यावर मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया काय कारवाई करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 12, 2014, 17:56