Last Updated: Saturday, June 29, 2013, 15:10
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्ली विद्यापीठांत प्रवेश घेतायं ?
प्रतिज्ञापत्र तयार ठेवा !
महाविद्यालयाचा अजब फतवा
या नव्या फतव्यानं विद्यार्थीनी नाराज!
दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक महत्तवाची बातमी आहे. विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी छेडछाड करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र आता केवळ विद्यार्थ्यांना नाही तर विद्यार्थीनींनाही द्याव लागणार आहे. रामजस महाविद्यालयानं अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र बंधनकारक केलंय.
रामजस कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या या सर्व विद्यार्थीनी सध्या काळजीत आहेत. त्यांना प्रवेशाची काळजी नाहीय.. तर प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेलं प्रतिज्ञापत्र कसं पूर्ण करायचं ही चिंता या विद्यार्थीनींना सतावतीय.
कॉलेजमध्ये शिकत असताना कोणत्या मुलाची छेड काढणार नाही, असं प्रतिज्ञापत्र दिलं तरच या विद्यार्थींना प्रवेश मिळणार आहे. दिल्ली विद्यापिठात प्रतिष्ठेचं समजलं जाणा-या रामजस कॉलेजनं हा अजब फतवा काढलाय. कॉलेजच्या या विचित्र फतव्यावरं सर्वत्र नाराजी आहे.
विद्यार्थीनी नाराज असल्या तरी कॉलेज प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम आहे.छेडछाड करण्यात मुलांसह मुलीही आघाडीवर असतात त्यामुळे हे प्रतिज्ञापत्र आवश्यक असल्याचा दावा कॉलेज प्रशासनानं केलाय.
प्रतिज्ञापत्र देऊनही ते न पाळणारी अनेक उदाहरण आपल्यासमोर आहेत. पणं तरीही कॉलेज प्रशासनाचा अशा कागदपत्रावर मोठा विश्वास आहे. मार्कांच्या त्सुनामीनं काळजीत असलेल्या दिल्लीकरांची या नव्या अटीमुळं आणखीनच तारांबळ उडणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, June 29, 2013, 15:10