Last Updated: Wednesday, December 25, 2013, 10:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहाराष्ट्र फायर प्रिवेंशन अक्टनुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थांना आता आपल्या शैक्षणिक इमारती ३०मिटरपेक्षा अधिक उंचीच्या करता येणार नसल्याने त्याचा फटका महाविद्यालयांना बसायला सुरुवात झालीय. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता नविन विद्यार्थ्यांना मुंबईत कुठून जागा आणायची असा प्रश्न निर्माण झालाय.
मुंबईतल्या प्रभादेवीमधलं हे रचना संसद आर्किटेक्चर कॉलेज. आर्किटेक्चर कॉलेज म्हटलं की लाकडाचे मोठे बोर्ड आलेच. त्यामुळेच एक क्लासरुम आणि मोजके विद्यार्थी असंच व्यवस्थापन कॉलेजला करावं लागतं..मात्र, आता विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जागा आणायची कुठून, असा प्रश्न रचना संसद कॉलेजला पडलाय.
कॉलेजला ८ व्या मजल्यांवरचे आपले ४ वर्ग तोडावे लागलेत. सध्या ७ मजल्यांचं कॉलेज हे ३० मीटरपेक्षा जास्त उंचीचं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं यंदा कॉलेजला आठव्या मजल्यावरचे वर्ग चालवायला मनाई केलीय आणि अग्निशमन विभागानंही परवानगी नाकारलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 25, 2013, 08:42