Last Updated: Tuesday, April 16, 2013, 16:35
www.24taas.com, मुंबईअजित पवारांनी असभ्य भाषेत शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता राष्ट्रवादीचेच नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अकोल्याच्या गोयंका डेंटल कॉलेजचे विद्यार्थी आणि पालक त्यांच्या तक्रारी घेऊन विजयकुमार गावित यांच्याकडे गेले होते. या विद्यार्थ्य़ांना दिलासा देण्याऐवजी गावित यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. कॉलेज व्यवस्थापनाकडून होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी गेलेल्या विजयकुमार गावित यांनी विद्यार्थी आणि पालकांची तक्रार ऐकूण घेण्य़ाऐवजी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली.
पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणमंत्री पदावर बसलेल्या या विजयकुमारांची शिव्यांची लाखोली कॅमे-यात कैद झाली आहे.
First Published: Tuesday, April 16, 2013, 15:29