Last Updated: Saturday, November 10, 2012, 09:56
www.24taas.com, मुंबई विद्यार्थ्यांसाठी एक खूषखबर आहे... आता यापुढे बँकांकडून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबणार आहे. कारण, शिक्षणासाठी कर्ज मागणारा एकही अर्ज रद्द न करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना दिलेत.
अनेकदा बँकांच्या क्लिष्ट कार्यपद्धतीमुळे शिक्षणासाठी बँकांकडून कर्ज मिळवणं विद्यार्थ्यांना त्रासदायक होत होतं. तसंच बँकेच्या सेवा क्षेत्रात राहत नसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद केले जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसात वाढत होत्या. मात्र, यापुढे सेवा क्षेत्राचा निकष केवळ सरकारी योजनांसाठी पाळला जावा, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिलेत. याबाबत रिझर्व्ह बँकेने अधिसूचनादेखील जारी केली आहे.
First Published: Saturday, November 10, 2012, 09:56