पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम बदलणार, first to eighth class change studies

पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम बदलणार

पहिली ते आठवीचा अभ्यासक्रम बदलणार
www.24taas.com,मुंबई

राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा अभ्यासक्रम बदण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम पुढील वर्षापासून टप्याटप्याने बदलण्यात येणार आहे.

नवीन अभ्यासक्रमाचा मसुदा तयार झाला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत यासाठी राज्यस्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना समिती नेमण्यात आली होती. तसेच, विविध ११ विषयांचे अभ्यासक्रम त्या-त्या विषयातील नामवंत तज्ज्ञांचा समावेश असलेल्या अभ्यास मंडळांकडून तयार करून घेण्यात आले. त्यामध्ये डॉ. अनिल काकोडकर (विज्ञान), वसंत आबाजी डहाके (मराठी), डॉ. हेमचंद्र प्रधान (गणित) आदी ख्यातकीर्त व्यक्तींनी या मसुद्याचे परीक्षण करून आपले अभिप्राय दिलेले आहेत, अशी माहिती दर्डा यांनी दिली.

तीन वर्षांत होणार अमलबजावणी

इयत्ता पहिली आणि दुसरीचा पुनर्रचित अभ्यासक्रम जून २०१३पासून लागू केला जाईल. इयत्ता तिसरी, पाचवी आणि सातवीचा जून २०१४पासून तर इयत्ता चौथी, सहावी आणि आठवीचा पुनर्रचित अभ्यासक्रम २०१५पासून लागू केला जाईल. अशा प्रकारे नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी तीन वर्षांत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

कसा असणार अभ्यासक्रम?

- विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण
- घोकंपट्टी होणार हद्दपार
- शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा परिपूर्ण विकास
- ज्ञानाचा संबंध शाळेबाहेरील जीवनाशी जोडणार
- अभ्यासक्रम पाठय़पुस्तकांच्या र्मयादेपलीकडे जाणार


First Published: Saturday, August 25, 2012, 09:49


comments powered by Disqus