Last Updated: Wednesday, January 15, 2014, 17:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सीए परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. महाराष्ट्राचा गौरव दीपक श्रावगी देशात पहिला आलाय. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. `बोले तो ऑल इंडिया में टॉप किया अपून ने`, अशी प्रतिक्रिया गौरवने फेसबुकवर पोस्ट केली आहे.
निकालाचे वृत्त समजताच गौरवच्या तोंडून ओ माय गॉड. मी भारतात पहिला आलोय, असे उद्गार आलेत. गौरव हा अकोल्यातील अकोटचा राहणारा आहे. त्याला ६६.७५ टक्के गुण मिळालेत. मी खूप कष्ट आणि परिश्रम घेतले. त्यामुळे हे यश मिळाले आहे. माझे यश हे मी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली आहे. मला मिळालेले हे यश माझ्या आई-बाबांना समर्पित केले आहे, अशी प्रतिक्रिया गौरव श्रावगी यांने व्यक्त केली आहे.
मला मार्गदर्शन करणारे प्राध्यापक मनीष ओझा यांचे खूप खूप आभार मानतो. माझे मित्र आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच आशीर्वाद असल्यानेच हे मी यश संपादन केले आहे. मला जरी हे यश मिळाले असले तरी आता माझा नवा प्रवास सुरू झाला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 15, 2014, 16:01