शासकीय हॉस्टेल्समध्ये विद्यार्थ्यांना बेकायदेशीर प्रवेश, government Hostels illegal schools students Admission

शासकीय हॉस्टेल्समध्ये विद्यार्थ्यांना बेकायदेशीर प्रवेश

शासकीय  हॉस्टेल्समध्ये विद्यार्थ्यांना बेकायदेशीर प्रवेश
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मुंबईतल्या हॉस्टेल्समध्ये विद्यार्थ्यांना बेकायदेशीर प्रवेश दिला जातोय. झी मीडियाच्या हाती लागलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघड झालीये.

चेंबूर इथं संत एकनाथ मागासवर्गीय शासकीय वसतीगृह आहे. नियमानुसार इथं थर्ड इअरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येत नाही. मात्र सर्रास पैसे घेऊन हा आणि असे अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं स्पष्ट झालंय. त्यासाठी इथले रेक्टर झिम्मल स्वतःच कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा सल्ला देतात. काही व्यावसायिकही या हॉस्टेलमध्ये रहात असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिलीये.

इतकंच नाही, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या हॉस्टेलमध्ये खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनाही पैसे घेऊन प्रवेश दिला जातोय. यासाठी इथं दलालांचं जाळं कार्यरत आहे. हे दलाल आणि वसतीगृहातले अधिकारी यांचं साटंलोटं असल्याचं तत्थ्य या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलंय.

या हॉस्टेलची क्षमता १७५ विद्यार्थ्यांची आहे. अशी ४ वसतीगृहं एकट्या मुंबईत आहेत. एका विद्यार्थ्याला गैरमार्गानं प्रवेश देण्यासाठी ४० ते ५० हजारांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याची माहिती समोर आलीये. यामुले या हॉस्टेलमधल्या प्रवेशासाठी लाखो रुपयांचा अपहार होत असणार, हे स्पष्ट आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 15:15


comments powered by Disqus