तामिळनाडूत आढळलं आठव्या शतकातील गुप्त गुंफा मंदिर, Hidden temple from 8th century discovered

तामिळनाडूत आढळलं आठव्या शतकातील गुप्त गुंफा मंदिर

तामिळनाडूत आढळलं आठव्या शतकातील गुप्त गुंफा मंदिर
www.24taas.com, झी मीडिया, तिराचिरापल्ली

तामिळनाडू येथील तिराचिरापल्लीमधील गावानजीक पुरातत्व खात्याच्या लोकांना अर्धवट बांधकाम झालेलं गुंफा मंदिर सापडलं आहे. हे मंदिर आठव्या शतकातील असल्याची संभावना आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात डी. दयालन यांना शीला मंदिरांचा अभ्यास करताना तिराचिरापल्ली येथून २८ किलोमीटरवर लालगुडीच्या पल्लापुरममध्ये अर्धवट गुंफा मंदिर आढळलं आहे. दयालन यांच्या मते या मंदिराची योजना सातव्या किंवा आठव्या शतकात आखण्यात आली होती. याच काळात तिरनेल्लाराई (श्री पुंडरिकक्षा पेरमल मंदिर) आणि तिरप्पंजली (शिव मंदिर) येथेही अशा प्रकारची मंदिरं बांधण्यात आली आहेत.

हे गुंफा मंदिर नेमकं केव्हा बांधण्यात आलं आहे, याची निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. मात्र जेव्हा इतर दोन मंदिरं बांदण्यात आली, त्याच काळात हे मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला गेला असावा. दयालन या मंदिरांचा अभ्यास करत असतानाच त्यांना या अर्धवट गुंफा मंदिरांचा शोध लागला. या मंदिरांजवळच या मंदिरासाठी भूमिदान करण्यासंबंधीचा शिलालेखही आढलून आला आहे. हा शीलालेख ११ व्या शतकातील असून चोल राजांच्या काळातील हा शिलालेख आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 13, 2013, 18:37


comments powered by Disqus