लेक्चर सुरू असताना तरूणीवर कुऱ्हाडीचा घाव, JNU girl student attacked in campus with axe, attacker dies

लेक्चर सुरू असताना तरूणीवर कुऱ्हाडीचा घाव

लेक्चर सुरू असताना तरूणीवर कुऱ्हाडीचा घाव
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत दिवसागणिक वाढ होत आहे. जेएनयुमध्ये आज लेक्चर सुरू असताना कुऱ्हाड घेऊन प्रवेश केलेल्या एका तरूणाने तरूणीवर हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ला करणाऱ्या तरूणांने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांना तात्काळ एम्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये क्लास सुरू होता. विभागाच्या वर्गामध्ये सकाळी अकरा वाजता लेक्चर सुरू झाले. याचवेळी २३ वर्षीय तरुणाने क्लासमध्ये प्रवेश केला. या तरूणाच्या हातात कुऱ्हाड होती. त्याने तरूणीशी हुज्जत घातली. यावेळी तिने प्रत्युत्तर दिले. याचवेळी हातातील कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ती रक्तांच्या थारोळ्यात पडली. क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला. याचवेळी हल्लेखोरांने विष प्राशन केले. तसेच स्वत:चा चिरण्याचा प्रयत्न केला.

हा प्रेमप्रकरणातून प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. क्लासमधून पोलिसांनी चाकू आणि कु-हाड जप्त केली आहे. ज्या क्लासमध्ये हा प्रकार झाला, तो क्लास पोलिसांनी सील केला आहे. या प्रकारामुळे विद्यापीठाची सुरक्षा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे. हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 31, 2013, 16:54


comments powered by Disqus