चला नोकरीची संधी: पोस्टात देशभरात ८२४३ जागा job vacancy in post office

चला नोकरीची संधी: पोस्टात देशभरात ८२४३ जागा

चला नोकरीची संधी: पोस्टात देशभरात ८२४३ जागा

www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतीय पोस्टात २२ विभागांमध्ये पोस्टल असिस्टंटची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०१४ आहे. महाराष्ट्रामध्ये पोस्टल असिस्टंटची ७९० पदे आणि सॉर्टिग असिस्टंट इन रेल्वे मेल सर्व्हिसेसची १७० पदे भरण्यात येणार आहेत. तर संपूर्ण देशात ८२४३ जागा आहेत.

यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण (बारावीला इंग्रजी विषय आवश्यक, मात्र महाराष्ट्रातील भरतीसाठी दहावीला मराठी भाषा विषय असणे आवश्यक). इंग्रजी टायपिंग वेग ३० शब्द प्रतिमिनिट असणे गरजेचे आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि टायपिंग चाचणी याद्वारे केली जाणार आहे.

अधिक माहिती आणि प्रवेश अर्जासाठी लॉग ऑन करा www.pasadrexam2014.in या संकेतस्थळावर... प्रवेश परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014, 12:48


comments powered by Disqus