Last Updated: Tuesday, April 29, 2014, 08:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या कॉलेजेसमध्ये २५ टक्के फी वाढी संदर्भातला निर्णय विरोधामुळे पुढे ढकललाय. फी वाढीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. या संदर्भात मुंबई विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली.
दहा तासाहून अधिक काळ चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही..विद्यापीठाने नेमलेल्या फी नियोजन समितीने 25 टक्के फी वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. विद्यापीठानं या प्रस्तावाला मान्यता दिली होती.मात्र फीवाढीला विद्यार्थी संघटनांनी प्रचंड विरोध केला.
विद्यापीठाबाहेर मनविसे, विद्यार्थी भारती, प्रहार आणि युवासेनेकडून आंदोलन करण्यात आलं.विद्यार्थी संघटनांसोबतच सिनेट सदस्य आणि बुक्टु या प्राध्यापकांच्या संघटनेनंही या निर्णयाला विरोध केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 29, 2014, 07:59