Last Updated: Friday, May 9, 2014, 23:05
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकं छापायची म्हणजे त्यात चुकाच असल्या पाहिजेत, हे चित्र आपण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या विषयाच्या पुस्तकाबाबत पाहतो. यंदा मात्र पाठ्यपुस्तक मंडळानं कहर केलाय. चौथीच्या पाठ्य पुस्तकात राष्ट्रगीतात अनेक चुका आहेत.
चौथीचा अभ्यासक्रम बदलला असून त्यानुसार नविन पुस्तके बाजारात आली आहेत. या चौथीच्या पुस्तकात चक्क राष्ट्रगीतातच चुका आढळल्या आहेत. त्यात राष्ट्रगीतात `आशिष मांगे` ऐवजी `आशिस मागे` असं छापलं गेलंय. इतकंच नाही तर राष्ट्रगीतात `सिंध` असा उल्लेख असतानाही `सिंधु` हा चुकीचा शब्द लिहिल्याची तक्रार भूगोलाचे अभ्यासक विद्याधर अमृते यांनी केलीय.
आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्याच चुका पाठ्यपुस्तक मंडळानं पुन्हा गिरवल्या असून याबाबत हायकोर्टानं देखील फटकारलं होतं. मात्र, पुन्हा यावेळेस त्याच चुका गिरवल्याने त्याबाबत खेद व्यक्त केला जातोय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 9, 2014, 22:49