Last Updated: Monday, July 22, 2013, 11:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बारावीला टेक्निकल व्होकेशनल विषयामध्ये आयटी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही आता इंजिनीअरिंगला प्रवेश मिळू शकणार आहेत. तसा आदेशच संभाजीनगर खंडपीठाने राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाला दिला आहे.
खंडपीठाचा हा निकाल येईपर्यंत इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २४ जुलैपर्यंत सगळे कॅप राऊंडस् पूर्ण होणार आहेत. त्यामुळे त्यानंतर उरलेल्या जागांवर आयटी घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत, अशा सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने दिल्या असल्याची माहिती सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी दिली.
बारावीला केमिस्ट्री विषयाला पर्याय म्हणून बायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी किंवा टेक्निकल व्होकेशनल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनीअरिंगला प्रवेश देण्यात यावा, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. मात्र, व्होकेशनलमध्ये कोणते विषय घेतले जावेत याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या नव्हत्या. म्हणूनच विद्यार्थी न्यायालयात गेले होते. खंडपीठाने त्याचा निकाल देताना आयटी या विषयाचाही समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, July 22, 2013, 11:43