Last Updated: Tuesday, April 30, 2013, 19:41
www.24taas.com,झी मीडिया,मुंबई८५ दिवसांपासून संप करुन विद्यार्थी आणि सरकारला वेठीस धरणा-या प्राध्यापकांवर कारवाईची कु-हाड कोसळणार आहे. ४ मे पर्यंत संप मागं न घेतल्यास प्राध्यापकांवर मेस्मांतर्गंत कारवाई केली जाणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी संपक-यांना अल्टिमेटम दिलाय. मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांनी कारवाईसाठी हिरवा कंदील दाखवलाय. त्यानुसार प्राध्यापकांवर मेस्मांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
प्राध्यापकांचा पगार रोखणे, निलंबन आणि खात्यांतर्गत चौकशी केली जाणार आहे. प्राध्यापकांना थकबाकीची रक्कमही मिळणार नाही. सुरुवातीला नरमाईचं धोरण स्वीकारलेल्या सरकारनं आता कठोर भूमिका घेतलीये.
First Published: Tuesday, April 30, 2013, 19:41