Last Updated: Tuesday, February 11, 2014, 09:59
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीUPSC च्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे.युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी आता दोन अधिक संधी मिळणार आहेत. खुल्या गटातल्या विद्यार्थ्यांना आता ६ संधी मिळणार आहेत. तसंच त्यांची वयोमर्याद ३० ऐवजी ३२ असणार आहे.
ओबीसी गटाच्या विद्यार्थ्यांना ७ ऐवजी ९ संधी मिळणार असून त्यांची वयोमर्यादा ३३ ऐवजी ३५ असणार आहे. एस.एसटी प्रवर्गासाठी वयोमर्याद ३७ होणार आहे. ऑगस्ट २०१४ च्या परीक्षेपासून नवे नियम लागू होणार आहेत. या परीक्षेची जाहीरात मे महिन्यात प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अधिक संधी मिळाव्यात आणि कमाल वयोमर्यादेमध्येही वाढ व्हावी, अशी मागणी उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुषंगाने आता केंद्र शासनाने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना दोन संधी वाढवून दिल्या आहेत. वाढवून देण्यात आलेल्या संधींच्या अनुषंगाने परीक्षा देण्याची वयोमर्यादाही वाढवण्यात आली आहे.
याबाबतचे परिपत्रक केंद्र शासनाच्या कार्मिक, तक्रार निवारण आणि पेन्शन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार खुल्या गटासाठी ४ ऐवजी ६ संधी मिळणार आहेत आणि वयोमर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. एससी, एसटी प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३७ होणार आहे. ऑगस्ट २०१४ च्या परीक्षेपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, February 11, 2014, 09:39