महिला कॉलेजमध्ये आढळल्या 50 सेक्स सीडीज Sex CDs recovered from girls college in Puducherry

महिला कॉलेजमध्ये आढळल्या 50 सेक्स सीडीज

महिला कॉलेजमध्ये आढळल्या 50 सेक्स सीडीज

www.24taas.com, पुद्दूचेरी

भारताचे केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुद्दूचेरीमधील मुथियलपेट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुथियलपेट येथील एका महिला कॉलेजमधून पोलिसांनी अश्लील सिनेमांच्या जवळपास 50 सीडीज जप्त केल्या आहेत. महिला कॉलेजमध्ये या सीडीज कुठून आल्या आहेत, याची पोलीस चौकशी करत आहेत.

ज्या महिला कॉलेजमधून या सेक्स सीडीज जप्त करण्यात आल्या आहेत, त्या कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि शिक्षिकांचीही चौकशी करण्यात येत आहे. महिला कॉलेजमध्ये अशा सीडीज सापडणं हे अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेज सुरू असतानाच काही मुलींनी कॉलेजमध्ये मिळणाऱ्या अपूर्ण सुविधांविरोधात कॉलेज परिसरात धरणं धरलं होतं. याचवेळी मोटर सायकलवरून काही तरूण मुलं आली. त्यांनी या मुलींवर अश्लील सिनेमांच्या सीडी फेकल्या आणि पळून गेले.

नेमकं काय घडलं होतं, याची पोलीस चौकशी करत आहेत. महिला कॉलेजमध्ये अशा सीडीज आल्या तर, नेमक्या कशा आल्या आणि जर तरुण मुलांनी फेकल्या असतील तर ते तरुण कोण होते, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी मुलींकडून या सीडीज जप्त करून तपासाला सुरूवात केली आहे.

First Published: Tuesday, September 4, 2012, 13:22


comments powered by Disqus