Last Updated: Wednesday, January 8, 2014, 22:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यपक नीरज हातेकर यांच्या निलंबनाच्या विरोधात या विभागातील विद्यार्थ्यांनी सुरु केलेलं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलंय.
या आंदोलनामुळे कायदा आणि सुवस्था धोक्यात असल्याची पोलिसांनी आंदोलकांना नोटीस दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. विद्यापीठाकडून करण्यात आलेले हातेकरांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी कलिना कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं.
काही प्राध्यपकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. कलिना कॅम्पसचे दोन गेटही विद्यार्थ्यांनी बंद केले होते.आंदोन मागे घेतलं असलं तरी ११ तारखेला होणा-या पदवीप्रदान समारंभाच्या दिवशी विद्यार्थी निदर्शनं करणार आहे.
प्राध्यापक नीरज हातेकर यांच्या निलंबनाच्या विरोधात या विभागातील विद्यार्थी अधिक आक्रमक झाले होते.
विद्यापीठाकडून करण्यात आलेले हातेकरांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून कलिना कॅम्पस येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. याचाच एक भाग म्हणून कलिना कॅम्पसचे दोन गेटही विद्यार्थ्यांनी बंद केले होते. अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख आपनंही हातेकरांच्या निलंबनाविरोधातल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Wednesday, January 8, 2014, 22:40