NDAतले विद्यार्थी होणार 'इंजिनिअर' - Marathi News 24taas.com

NDAतले विद्यार्थी होणार 'इंजिनिअर'

 www.24taas.com, पुणे
 
इंजिनिअरिंगमध्ये उत्सुक असणाऱ्यांसाठी एक खूषखबर आहे. आणि तीही पुण्यातल्या एनडीएमधून. पुण्यातल्या एनडीएमध्ये आता इंजिनिअरिंगची पदवीही घेता येणार आहे.
 
एनडीएचे कमांडर लेफ्नंट जनरल जोगिन्दर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. पुण्याच्या एनडीएमध्ये आजवर B.SC, B.COM आणि B.A चं शिक्षण दिलं जात होतं. आता लष्करी प्रशिक्षणासोबतच इंजिनिअरिंगचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.
 
हा कोर्स सुरू करण्य़ासाठी अजून एक वर्ष लागेल, पण ज्या विद्य़ार्थ्यांची खरचं इच्छा आहे की इंजिनिअर व्हायचं आहे. त्यांच्यासाठी NDA ने ही चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.
 
 
 
 

First Published: Tuesday, May 22, 2012, 23:00


comments powered by Disqus