चला महाबळेश्वरमध्ये ढगांचा अभ्यास करूया - Marathi News 24taas.com

चला महाबळेश्वरमध्ये ढगांचा अभ्यास करूया

www.24taas.com,  महाबळेश्वर
 
महाबळेश्वर इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे ढग संशोधन केंद्र उभारण्यात आलं आहे. याठिकाणी जास्त पावसाचे ढग आणि कमी पावसाचे ढग यांचा अभ्यास केला जाणार. भारत सरकारच्या मान्सून मिशन या कार्यक्रमांतर्गत ढग संशोधन केंद्र साकारण्यात आलं आहे. यापूर्वी विमानाच्या माध्यमातून ढगांच्या अंतरंगात जाऊन अभ्यास निरिक्षणे करण्यात आली.
 
परंतू हा प्रयोग फारसा व्यवहार्य  ठरला नव्हता. महाबळेश्वरमध्ये ढग जमिनीवर असतात. त्यामुळं कायपेक्स प्रयोगाचा पुढील टप्पा या संशोधन केंद्रात होणार आहे. तापमान, आर्द्रता,बाष्पीभवन, रेडिएशन आदीचा अभ्यासही याठिकाणी होणार आहे.
 
विशेष म्हणजे ३५ किलोमीटर परिसरातील ढगांचे विश्लेषण करता येणार आहे. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या केंद्राचे उद्धाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.
 
 
 
 
 
 
 

First Published: Thursday, May 24, 2012, 22:50


comments powered by Disqus