देशभरात इंजिनिअरींगसाठी एकच सीईटी- सिब्बल - Marathi News 24taas.com

देशभरात इंजिनिअरींगसाठी एकच सीईटी- सिब्बल

www.24taas.com, नवी दिल्ली
 
इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी यापुढे देशभरात एकच सामयिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी केली. २०१३ पासून यांची अंमलबजावणी केली जाईल, असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे. सिब्बल यांनी यासंबंधी आयआयटी, एनआयआयटी, आयआयआयटी कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
 
या नव्या फॉर्म्युल्यानुसार आयआयटीमध्ये प्रवेशासाठी बारावीच्या मार्कांना ५० टक्के वेटेज दिलं जाईल तर जेईईच्या मार्कांना ५० टक्के वेटेज दिलं जाईल. त्यातून मुलांचं स्क्रीनिंग होईल आणि जेईई अडव्हान्स टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर आयआयटीमध्ये प्रवेश दिला जाईल. एनआयआयटी, आयआयआयटी आणि केंद्राकडून अनुदान घेणाऱ्या विद्यालयांमध्ये बारावीच्या मार्कांना ४० टक्के, जेईईच्या गुणांना ३० टक्के आणि अडव्हान्स जेईई टेस्टला ३० टक्के वेटेज दिलं जाईल.
 
इंजिनीअरिंगसाठी आता एकच सीईटी
 
इंजिनिअरिंग प्रवेशासाठी यापुढे
देशात एकच सामायिक
प्रवेश परीक्षा
 
२०१३ पासून होणार
एकच सामायिक परीक्षा
 
आयआयटीच्या प्रवेशासाठी
बारावीच्या मार्कांना ५० टक्के,
तर जेईईच्या मार्कांना ५० टक्के वेटेज
 
एनआयआयटी, आयआयआयटी प्रवेशासाठी
बारावीच्या मार्कांना ४० टक्के, जेईईच्या
मार्कांना ३० टक्के तर एडव्हान्स जेईईच्या
मार्कांना ३० टक्के वेटेज 
 
 
 
 
 

First Published: Monday, May 28, 2012, 18:01


comments powered by Disqus