Last Updated: Tuesday, May 29, 2012, 11:37
www.24taas.com, नवी दिल्ली केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा बारावी - वर्ष १०१२चा निकाल नुकताच जाहीर झालाय. याही परीक्षेत मुली मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाल्या आहेत.
सीबीएसई बोर्डात मणीपूरच्या मोहम्मद इशमत या विद्यार्थ्यांनं पहिला क्रमांक पटकावलाय. तर दिल्लीचा शितिश जैन हा दुसऱ्या स्थानावर आहे. पण, याही परिक्षेत मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होऊन मुली पुन्हा एकदा अव्वल ठरल्यात. सीबीएसई अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या परिक्षेत ८६.२१ टक्के मुली तर ७५.८० टक्के मुलं या परिक्षेत उत्तीर्ण झाली आहेत.
रिझल्ट पाहण्यासाठी इथं क्लिक करा पूर्ण देशभरात एकाच दिवशी सीबीएसई परीक्षेचे निकाल घोषीत झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये निकालाविषयी उत्सुकता लागून राहिलेली होती. यंदा तब्बल ८ लाख १६ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. एकूण आठ सीबीएसई बोर्डांपैकी चेन्नई बोर्डानं बाजी मारलीय. चेन्नई क्षेत्रातले ९०.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. चेन्नई क्षेत्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. हे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाइटवर लॉग ऑन करू शकतात. तसचं इंटरनेट किंवा मोबाईलद्वारेही आपला निकाल पाहू शकतील.
CBSE WEBSITE -
www.results.nic.in किंवा
www.cbseruselt.nic.in किंवा
www.cbse.nic.inकिंवा फोन करा – ०११ – २४३५७२७६ या नंबरवर
First Published: Tuesday, May 29, 2012, 11:37