आयआयटीत मुस्लिम विद्यार्थ्यांची बाजी - Marathi News 24taas.com

आयआयटीत मुस्लिम विद्यार्थ्यांची बाजी

www.24taas.com, मुंबई
 
आयआयटी- जेईई या महत्वाच्या तब्बल ४०० परिक्षांत मुस्लिम विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यापूर्वी अनेक कारणांनी या समाजातील विद्यार्थी या परिक्षांमध्ये चमक दाखवू शकत नव्हते. मात्र हे स्वप्न आता साकार झालंय.
 
यंदाच्या आयआयटी- जेईई या महत्वाच्या परिक्षेत मुस्लिम विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. तब्बल ४०० मुस्लिम विद्यार्थी या आयआयटीच्या प्रवेश परिक्षेत उत्तम मार्कांनी पास झालेत. यापूर्वी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अशा प्रवेश परिक्षेत यश मिळवणं म्हणजे स्वप्नवत वाटायचं. त्यामुळे या परीक्षेत पास होणाऱ्या या समाजातील मुलांची संख्या कमी होती. मात्र हे स्वप्न आता साकार झालंय.  बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे हे यश मिळाल्याचं या समाजातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
२०१२ या वर्षात घेतल्या गेलेल्या आयआयटी- जेईई या परीक्षेत एकूण २४,११२ विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. मात्र यातील फक्त १९,४२६ विद्यार्थ्यांना आयआयटीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे उत्तीर्ण झालेले झालेल सर्व ४०० परीक्षांतील मुस्लिम विद्यार्थी १९ हजाराच्या आतच आहेत. त्यामुळे त्याचा प्रवेश निश्चित आहे...

First Published: Tuesday, June 5, 2012, 18:57


comments powered by Disqus