सीईटमध्ये 'ग्रेस मार्क' नाहीच मिळाले... - Marathi News 24taas.com

सीईटमध्ये 'ग्रेस मार्क' नाहीच मिळाले...

www.24taas.com, मुंबई
 
दुर्गम भागात रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांना दिल्या जाणार्‍या १० ते ३० ‘ग्रेस’ मार्कांचा ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी उपयोग करता येणार नाही. ‘सीईटी’त उत्तीर्ण व्हावयाचे असल्यास या परीक्षेत किमान गुण मिळविणे आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.
 
मास्टर इन डेंटल सर्जरीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी सीईटीमध्ये मिळालेले गुण कमी पडत असल्याने त्यात ‘ग्रेस’ मार्कांचा समावेश करण्यात येऊन आपल्याला या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका डॉ. अविनाश काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती, मात्र डॉ. काळे यांची मागणी फेटाळून लावत न्यायालयाने याचिका निकाली काढली.
दुर्गम भागातील सार्वजनिक आरोग्य केंद्रात प्रॅक्टिस करणार्‍या डॉ. अविनाश काळे आणि डॉ. चित्रा थोरवडे यांनी मास्टर इन डेंटल सर्जरीच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी दिली होती. या परीक्षेत डॉ. काळे यांना ३३ तर डॉ. थोरवडे यांना ४० गुण या निकालामुळे मिळाले.
 
 
 
 
 

First Published: Saturday, June 9, 2012, 17:17


comments powered by Disqus