Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:25
www.24taas.com, मुंबई 
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण 81.32 टक्के लागला आहे. बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 81.32 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
यामध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे. तर विभागानुसार लागलेल्या निकालात यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 93. 94 टक्के लागला आहे. तर सर्वात पिछाडीवर लातूर विभाग पडला आहे.
लातूर विभागाचा निकाल 69.01 एवढा लागला आहे. यंदाच्या निकालामुळं लातूर पॅटर्न संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे. तर बारावीप्रमाणं दहावीच्या निकालातही बाजी मारणा-या कोकण विभागाच्या वरचढ निकालानं कोकण पॅटर्नचा उदय झाला आहे.
१. http://mahresult.nic.in २. www.msbshse.ac.in ३. http://sscresults2012.in ४. www.mh-ssc.ac.in ५. www.sscresult.mkcl.org ६. www.exametc.com ७. www.results.bharatstudent.com ८. www.myssc.in ९. www.studyssconline.com १०. www.rediff.com/exams वरील वेबसाईटवर आपल्याला आपला निकाल पाहता येणार आहे. जाणून घ्या आपला निकाल काय आहे.
First Published: Wednesday, June 13, 2012, 14:25