Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:21
www.24taas.com, मुंबई 
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा एकूण ८१.३२ टक्के लागला आहे. बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८१.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल तुमच्या विभागानुसार देखील देण्याता आला आहे. काय आहे आपला निकाल , आपल्या विभागाचा निकाल जाणून घ्या
मुंबई विभाग : ८८.९४ %मुंबई विभागाचा निकाल हा ८८.९४ टक्के आहे. त्यामुळे मुंबईने पुन्हा एकदा चांगल्या निकालाची पंरपरा पुढे सुरू ठेवली आहे.
कोकण विभाग : ९३.९४ %कोकण विभागाचा निकाल ९३.९४ टक्के आहे. कोकण विभागाने यावर्षी राज्यात अनपेक्षितपणे बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे.
पुणे विभाग : ९०.७१ %पुणे विभागाचा निकाल ९०.७१ टक्के आहे. पुणे विभागाचा निकाल हा राज्यात क्रमांक दोनचा आहे. कोकण विभागानंतर पुण्याचा निकाल हा सर्वाधिक आहे.
कोल्हापूर विभाग : ७९.१७ %कोल्हापूर विभागाचा निकाल हा ७९.१७ टक्के आहे. कोल्हापूरमध्ये निकाल हा चांगला लागला आहे. त्यात मुलींनी बाजी मारली आहे,
नाशिक विभाग : ७७.०७ %नाशिक विभागाचा निकाल हा ७७.०७ टक्के इतका लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल हा समाधानकारक लागला आहे. दरवेळेसप्रमाणे नाशिक विभागाचा निकाल हा चांगला लागला आहे.
नागपूर विभाग : ७४. ५५ %नागपूर विभागाचा निकाल ७४.५५ टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल चांगला आहे. नागपूरमध्येही निकालात बाजी मारली आहे.
औरंगाबाद विभाग : ७१.३६ %औरंगाबाद विभागाचा निकाल ७१.३६ टक्के लागला आहे. औरंगाबादमध्ये निकाल हा बऱ्यापैकी लागलेला आहे. दरवेळेस प्रमाणे सरासरी निकाल औरंगाबादचा आहे.
अमरावती विभाग : ७०.०७ %अमरावती विभागाचा निकाल ७०.०७ टक्के लागला आहे. अमरावती विभागाचा निकाल हा सर्वसाधारण आहे. अमरावती विभागाचा निकाल समाधानकारक आहे.
लातूर विभाग : ६९.०१ %राज्यात सर्वाधिक कमी निकाल हा लातूर विभागाचा आहे. लातूर विभागाचा निकाला हा सर्वाधिक कमी म्हणजे ६९.०१ टक्के इतका लागला आहे. राज्यात लातूर पॅर्टन सर्वप्रचलित होता. मात्र मागील काही वर्षापासून लातूर विभागाचा निकाल अत्यंत कमी लागत आहे.
First Published: Wednesday, June 13, 2012, 14:21